राहुल निकम यांना कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कविवर्य नारायण सुर्वे यांनी कामगारांकडून दहा रुपये वर्गणी गोळा करून नाशिक येथे स्थापन केलेल्या कवी नारायण सुर्वे वाचनालयाचा कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जळगाव येथील कथाकार राहुल निकम यांना मराठी साहित्यातील थोर विचारवंत, लेखक रावसाहेब कसबे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कादंबरीकार उत्तम कांबळे, आजचे आघाडीचे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी फ्रैक्चर्ड फ्रीडम या कोबाड गांधी यांच्या आत्मकथनाला, भैरवायन नीलम माणगावे कादंबरीला उत्क्रांतीच्या वाटेवरील संस्कृतीची पावले जयप्रकाश म्हात्रे यांच्या संशोधन ग्रंथाला, ब्लाटेंटिया बाळासाहेब लबडे यांच्या कविता संग्रहाला, संवर्ग, राहुल निकम यांच्या कथासंग्रहाला व पत्रकार निरंजन टकले यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार नारायण सुर्वे वाचनालयाच्या वतीने प्रदान करण्यात आले आहेत.

कथाकार राहुल निकम यांच्या संवर्ग या दुसऱ्या कथासंग्रहाला राज्यातील एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध साहित्यिक संस्थानी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Protected Content