देशात प्रथमच मुख्यमंत्री गायब; भाजपकडून बक्षीस जाहीर

रांची-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा । झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाले आहेत. देशातून मुख्यमंत्री बेपत्ता होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोरेने नेमके कुठे गेले आहेत याची कुणालाच माहिती नाही. त्यांच्या प्रोटोकॉल विभागालाही त्याबाबतची माहिती नाहीये. ईडीचे अधिकारी सोरेन यांची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे सोरेन यांच्यावर भाजपने बक्षीसही जाहीर केलं आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी हे बक्षीस जाहीर केलं आहे.

माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही घोषणा केली आहे. झारखंडच्या जनतेने मुख्यमंत्र्यांचा शोध घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीच्या भीतीने गायब झाले आहेत. गेल्या 40 तासांपासून त्यांचा काहीच शोध लागत नाहीये. लोकलज्जा सोडून मुख्यमंत्री गायब झाले आहेत. आपलं तोंड लपवून फिरत आहेत, अशी टीका बाबूलाल मरांडी यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांचं अशा गायब होण्याने त्यांच्या सुरक्षेला धोका आहेच. शिवाय झारखंडच्या जनतेच्या सुरक्षेलाही धोका आहे. झारखंडच्या जनतेची इज्जत आणि त्यांच्या मानसन्मानालाही धोका आहे, असं मरांडी यांनी म्हटलं आहे. तसेच सोरेन यांना शोधून देणाऱ्याला इनामही घोषित केला आहे. कोणताही विलंब न लावता जो कोणी मुख्यमंत्र्यांचा पत्ता सांगेल, मुख्यमंत्र्यांना सहीसलामत घेऊन येईल, त्याला अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिलं जाईल, असं बाबूलाल मरांडी म्हणाले.

आपल्या पोस्टमध्ये मरांडी यांनी झारखंडच्या लोकांना मार्मिक अपील केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी सोरेन यांचा एक फोटोही छापला आहे. त्यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री बेपत्ता असं लिहिलंय. दरम्यान, रविवारी सोरेन दिल्लीत होते. भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी होणार होती. ईडीचे अधिकारी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पण सीएम तिथे नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक तास सोरेन यांची वाट पाहिली. पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.

Protected Content