लोणपिरा जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मंडळ कार्यक्रम

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील लोणपिरा येथील जिल्हा परिषद शाळाच्या प्रांगणात ३० जानेवारी रोजी बाल आनंद मंडळाचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अशोक पाटील यांनी केले. तर गिरधर पाटील हे प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक महेंद्र सावकारे यांनी केले.
कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध पद्धतीचे विशेष पदार्थ बनवून आणलेले होते. पालक वर्गाच्या उपस्थितीमुळे सदरच्या कार्यक्रमाला विशेष शोभा आली.

सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन पाहून गावातील सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले व कार्यक्रमासाठी शाळेला शुभेच्छा दिला. तसेच शाळेकडून विद्यार्थ्यांना मसाला भात व जिलेबी वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजू पाटील, उज्वला पवार, विद्या आंबेकर व सुनील शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content