वायरमन मृत्युप्रकरणी सहा आरोपींना अटक

भडगाव प्रतिनिधी । येथिल महावितरण कंपनीचे अधिकारी यांना मारहाण व मृत्युप्रकरणी सात पैकी सहा संशयीत आरोपीना अटक करण्यात पोलीसाना यश आले आहे. यात पाचोरा येथिल पाच तर भडगाव तालुक्यातील एक आरोपी असून एक आरोपी अद्यापही फरार असुन भडगाव पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

महावितरण अधिकारी मारहाण प्रकरणातील आरोपी हे पाचोरा येथील शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे.  भडगाव येथे पाच दिवसापुर्वी शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते.  आंदोलना नंतर दुपारी १ वाजेच्यासुमारास चाळीसगाव रोड लगत असलेल्या महावितरण कंपनीच्या कार्यालयात अज्ञात ७ जणानी प्रवेश करत कार्यालयात कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता अजय अशोक धामोरे (वय ४३) रा. पाचोरा यांना यांना चापटाबुक्क्यानी मारहाण, शिवीगाळ करत दमदाटी करत कॕबिन मध्ये असलेले कंम्प्युटर, युपीएस. तसेच टेबलावरील व कॕबिनच्या काचा फोडत अंदाजे ५० ते६० हजार रुपये पर्यतच्या शासकीय मालमत्तेचे साहित्य फोडुन नुकसान केले होते. 

यावेळी जवळच हजर असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन प्रताप राणे हे भांडण सोडविण्यास गेले असता संशयीत आरोपीनी गजानन राणे यांना देखिल धक्काबुक्की केली. यात गजानन राणे खाली पडुन मयत झाले होते. या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचारी वर्गात खळबळ उडुन भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अजय धामोरे यांना मारहाण व वरीष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) गजानन प्रताप राणे यांच्या मृत्युस कारणीभुत असलेले सर्व संशयीत आरोपी फरार होते. महावितरण कंपनीचे अधिकारी यांना मारहाण व वायरमण मृत्यु प्रकरणी आरोपी शोध घेणे पोलीसाना आवाहान ठरत होते. यावरुन पाचोरा भडगाव तालुक्यात राजकारण देखील चांगलेच तापले होते. या प्रकरणी भडगाव पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस यांनी तब्बल पाच दिवस शोध घेत आज दुपारी सात पैकी सहा आरोपीना ताब्यात घेण्यात यश आले. यात जितेद्र विश्वासराव पेढारकर, अनिल बारकू पाटील, संदीप रामदास पाटील, सुमित रविद्र सांवत, गणेश सुदाम चौधरी सर्व राहणार पाचोरा, चरणसिंग प्रेमसिंग पाटील रा. वडगाव सतीचे ता. भडगाव यांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्यापही फरार असुन त्याच्या शोध सुरु आहे. 

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, उपविभागिय अधिकारी कैलास गांवडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक कीरणकुमार बकाले, यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक अशोक उतेकर करीत असुन तपास पथकात भडगाव येथिल पोलीस उप निरीक्षक सुशिल सोनवणे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, प्रल्हाद शिदे, नितीन रावते, पोकाॕ. ईश्वर पाटील, स्वप्नील पाटील याचा सहभाग होता. सर्व आरोपीना भडगाव न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपीना चार दिवस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.

 

Protected Content