फैजपूर येथे खरीप हंगाम आढावा बैठक

फैजपूर प्रतिनिधी । रावेर- यावल तालुक्याची कृषी संबंधित मान्सूनपूर्व खरीप हंगाम बैठक आ.शिरीष चौधरी यांनी प्रांताधिकारी कैलास कडलग व रावेरच्या तहसीलदार उषारणी देवगुणे यांच्या उपस्थितीत घेतली.

 या बैठकीस रावेर यावल अशा दोन्ही तालुक्यातील कृषी अधिकारी, कृषी विक्रेते संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी यावल तालुका कृषी अधिकारी जाधव,पंचायत समिती कृषी अधिकारी दिनेश कोते,रावेर चे तालुका कृषी अधिकारी विजय भामरे,पंचायत समिती कृषी अधिकारी,एल ए पाटील रावेर ऍग्रो डीलर्स असो.चे अध्यक्ष सुनील कोंडे,यावलचे ऍग्रो डीलर्सचे अध्यक्ष मनोज वायकोळे,युवराज महाजन, राहुल पाटील, एकनाथ महाजन, श्रीपाद जंगले, डॉ जी एम बोंडे,राकेश जैन, भूषण चौधरी यांसह शशांक पाटील, चंद्रकांत भंगाळे यांसह दोन्ही तालुक्यातील कृषी सहाय्यक व कर्मचारी उपस्थित होते.याईली यावल तालुका कृषी अधिकारी जाधव व रावेर तालुक्याची विजय भामरे  यांनी यावल व रावेर तालुक्याचा आढावा सांगितला. 

त्यात पिकनिहाय स्थिती तसेच विविध योजनांची माहिती दिली.तर पंचायत समिती यावलचे दिनेश कोते व रावेर चे एल ए पाटील यांनी दोन्ही तालुक्यातील खतांची आकडेवारी तसेच उपलब्धता व मागणी तसेच खतांची कमतरता याबाबत माहिती दिली.रावेर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे यांनी खतांच्या पॉस मशीन मधून एका शेतकऱ्यासाठी ५० बॅगची आत अडचणीची ठरत असल्याचे सांगितले सोबतच कापूस बियाणे उशिरा विक्रीमुळे नुकसान होऊन परराज्यातून कापूस बियाणे आल्याने नुकसान झाल्याचे सांगितले.यावेळी आ शिरीष चौधरी यांनी याबाबत शेतकरी,अधिकारी व कृषी विक्रेते या तिन्ही घटकांनी एकत्र बसून माहिती द्यावी व त्याबाबत आपण पाठपुरावा करू असे सांगितले.यावेळी रावेर तालुक्याला युरियाचा बफर स्टॉक मिळाल्याबद्दल आ.शिरीष चौधरी यांचे रावेर असोसिएशन ने आभार मानले तर यावल तालुका अध्यक्ष मनोज वायकोळे यांनीही बफर स्टॉकसाठी निवेदन दिले.

Protected Content