प्रभाग समिती क्रमांक २ च्या सभापतीपदी प्रविण कोल्हे यांची निवड

जळगाव राहूल शिरसाळे । महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २ च्या सभापतीपदी प्रविण कोल्हे यांची निवड करण्यात आली.  पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडीची घोषणा केली. 

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड नगरसचिव अनिल गोराणे उपस्थित होते.  जळगाव महापालिकेच्या चार प्रभाग समितीच्या सभापतींची निवड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येत आहे. यापुर्वी प्रभाग समिती क्रमांक १ च्या सभापतीपदी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रभाग क्रमांक २ साठी भाजपाचे मुकुंदा सोनवणे आणि भाजपा बंडखोर उमेदवार प्रविण कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवड प्रक्रियेत प्रविण कोल्हे यांना १३ मते तर मुकुंदा सोनवणे यांना ७ मते पडली आहेत. यात प्रभाग समिती क्रमांक दोन साठी प्रविण कोल्हे यांची निवड केल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी अभिजित राऊत यांनी केली.

Protected Content