हातनूर येथे गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील हातनूर येथे वरणगाव पोलीसांनी धडक कारवाई करत सुमारे ८० हजार रूपये किंमतीचे दारू व दारू बनविण्याचे साहित्य नष्ट केले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भुसावळ तालुक्यातील हातनुर हा भाग तापी पूर्णा नदीचा पट्टा म्हणून ओळखला जातो. या नदीकिनारी हातभट्टी दारू बनवण्याचे अनेक भट्ट्या सुरू आहेत. झाडाझुडपांच्या आतमध्ये गावठी दारू बनविण्याचा गोरख धंदा सुरू आहे. याची गोपनिय माहिती वरणगाव पोलीसांनी मिळाल्यानंतर आज सकाळी  वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी धाड टाकून गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत सुमारे ८० हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी नष्ट केला आहे. या कारवाईमुळे परिसरात गावठी दारू बनविणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!