धावत्या रेल्वेतून पडल्याने शिक्षकाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने रूस्तमजी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील २२ वर्षीय तरूण शिक्षकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. मयत तरूण हा मामाकडे जावून परतीच्या प्रवासात असतांना ही घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय शाम सोनी (वय-२२) रा. बऱ्हाणपुर मध्यप्रदेश ह.मु. जळगाव असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, विजय शाम सोनी हे जळगावातील स्तमजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. ते मुळ रहिवाशी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथील रहिवाशी आहेत. दरम्यान दिवाळी निमित्त ते कल्याण येथील मामांकडे भेटण्यासाठी गेले होते. कल्याणहून परत ते मुळगावी बऱ्हाणपुर येथे जाण्यासाठी बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी रेल्वेने प्रवास करीत आहे. जळगाव ते शिरसोली दरम्यान रेल्वेतून प्रवास करत असतांना रेल्वे खंबा क्रमांक ४०७जवळ धावत्या रेल्वेतून विजय सोनी हे पडले. त्यात सचिन सोनी हे गंभीर जखमी झाले.

ही घटना घडल्यानंतर जळगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार यांनी घटनास्थळी धाव घेवून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहे.

Protected Content