Home Cities जळगाव शितल लेकुरवाळे-सावळे यांची जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखपदी पदोन्नती 

शितल लेकुरवाळे-सावळे यांची जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखपदी पदोन्नती 

0
2

दीपनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शितल लेकुरवाळे-सावळे यांची पदोन्नतीने जळगाव जिल्ह्याच्या अधीक्षक भूमी अभिलेख या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना आणि कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भूमी अभिलेख विभागासह महसूल, कोषागार, कृषी आणि पाटबंधारे विभागांतील कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटन सचिव नुपम मेढे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिकचे विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना जळगावचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाडे, नाशिक विभागीय उपाध्यक्ष दिनेश ठाकूर आणि जळगावचे उपाध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी उपस्थित राहून लेकुरवाळे-सावळे यांचे अभिनंदन केले.

संघटनेच्या महिला उपाध्यक्षा ममता मेढे-बेहेरे, सदस्य राहुल बारी, जयदीप गाढे आणि अभिषेक पाटील यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. पदोन्नतीबद्दल त्यांचे स्वागत करून पुढील प्रशासकीय कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. महसूल विभागाच्या वतीने योगेश अडकमोल, जिल्हाध्यक्ष महेश सपकाळे, सुनील कराटे आणि संदीप खैरे उपस्थित होते. कोषागार विभागाचे रवींद्र गायकवाड तसेच कृषी विभागाचे किशोर मराळे यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दिली. पाटबंधारे विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, सचिव भाऊजी हटकर, कार्याध्यक्ष विकी गोंधळी आणि गुरुनाथ शेंगदाणे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी सत्कार कार्यक्रमात सहभाग घेतला. कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगावचे अनेक पदाधिकारी आणि सदस्यही यावेळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound