गोलाणी मार्केट परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोलाणी मार्केट परिसरातील लोकमत कार्यालयासमोर पार्कींगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गुलाम मोहम्मद गुलाम कादीर शेख (वय-४७) रा. शाहु नगर, पिंप्राळा, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता ते कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील लोकमत कार्यालयासमोर दुचाकी क्रमांक (एमएच १९ एएफ ५५२७) आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुलाम मोहम्मद यांनी त्यांच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र दुचाकी मिळून आली नाही. अखेर गुरूवारी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.

Protected Content