महावितरणच्या कंत्राटी कर्मचार्‍यांचे विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अयोध्या नगरातील महावितरण कार्यालयासमोर महावितरणच्या कंत्राटी कामागारांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. जोपर्यंत मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहिल असा पवित्रा घेतला आहे.

दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महावितरणच्या जळगाव मंडळ अंतर्गत जुन्या कंत्राटी कामगारांना १ ते २ वर्षापासून कमी करण्यात आले आहे. दरम्यान जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन वर्षाचा शैक्षणिक कालावधीसाठी कामावर हजर करण्याचे १ सप्टेंबर २०२३ प्रशासकीय पत्र काढण्यात आले आहे. असे असतांना जळगाव मंडळातील प्रशासन व कंत्राटदार हे कंत्राटी कामागारांना कामावर हजर करत नाही. कंत्राटी कामागारांना कामावर हजर करावे यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. जोपर्यंत कंत्राटी कामगारांना कामावर हजर करत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहिल असा पवित्रा कंत्राटी कामगारांनी घेतला आहे. याप्रसंगी या साखळी उपोषणात अनिल रामावत, चेतन बिचवे, प्रमोद ठाकूर यांच्यासह इतर कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत.

Protected Content