सर्पदंश झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू; रामानंदनगर पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा येथील तरूणाचा सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुकेश भिवा सोनवणे (वय-३०) रा. कोळी वाडा, पिंप्राळा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मुकेश सोनवणे हा तरूण शेती काम करून उदरनिर्वाह राहतो. आईवडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा अश्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते पिंप्राळा शिवारातील शेतात ट्रक्टरने टिलर करत असतांना लोखंडी नागरात कचरा अडकला होता. कचरा काढण्यासाठी मुकेश खाली उतरला होता. कचरा काढतांना कचऱ्या असलेल्या सापाने त्यांच्य उजव्या हाताला दंश केला. त्यात त्यांना चक्कर येवून लागल्याने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज गुरूवारी ४ नाव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता उचारादरम्यान मुकेश सोनवणे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content