अमृतधारा फाऊंडेशन आयोजित ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

 

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात प्रत्येक व्यक्ती घरातच राहून दुःख, चिंतेने कंटाळला आहे. चिंतातूर वातावरणात आनंदाचे क्षण देण्यासाठी अमृतधारा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्रियंका सोनी यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन राष्ट्रीय कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अडीच महिन्यात ५ टप्प्यात आयोजित संमेलनात देशाच्या कानाकोपऱ्यातील कवींनी सहभाग नोंदविला.

 

पहिले संमेलन कोरोना विषयाला अनुसरून घेण्यात आले. कोरोना व्हायरस, जनजागृती विषयी ६० कवींनी सहभाग नोंदवित ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपात कविता सादर केल्या. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर दुसरे संमेलन आयोजित करण्यात आले, त्यात ५० कवींनी कामगार विषयी कविता सादर केल्या. मातृ दिनानिमित्त आयोजित तिसऱ्या संमेलनात ५० कवी, लेखकांनी आई विषयी कविता, लघुकथा सादर केल्या. हास्य दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चौथ्या संमेलनात मनोरंजक हास्य कविता सादर करून सर्वांनी एकमेकांची मने जिंकली. त्यात ६० लोकांनी सहभाग घेतला होता. पाचवे आणि शेवटचे संमेलन पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आले होते. त्यात कविता आणि लघु कथेच्या माध्यमातून ४० लोकांनी भाग घेत आपले भाव मांडले. वेगवेगळे व्हाट्सअँप ग्रुप तयार करून अमृतधारा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्रियंका सोनी ‘प्रीत’ यांनी या संमेलनाचे आयोजन यशस्वी केले.

Protected Content