चोपडा येथील महिला मंडळ विद्यालयातर्फे वृक्षदिंडी

chopda mahila mandal

चोपडा प्रतिनिधी । गाव किंवा शहर असावा वृक्ष लागवडीवर भर, वृक्ष मानवाचा जीवनदायी मित्र, एकच लक्ष – ३३ कोटी वृक्ष, वृक्ष लावू – वृक्ष जगवू या सारख्या घोषणा आणि घोषवाक्यांनी तसेच आकर्षकरित्या सजवलेल्या बालतरुच्या पालखीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंगोपनाचा जागर बाल वारकऱ्यांनी शहरात केला.

 

बालतरुची विधिवत पूजा करून दिंडीचा प्रारंभ
येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्यावतीने वृक्षदिंडी आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त सजवलेल्या पालखीत श्री विठ्ठल रखुमाई व बालतरुची विधिवत पूजा करून दिंडीचा आरंभ करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, वनक्षेत्रपाल पी. बी. पाटील, सहाय्यक वनरक्षक व्ही. एच. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे, वनपाल भावना सांगोरे, वनरक्षक रोशनी पवार, सीमा भालेराव, देवेंद्र चौधरी, विजय चौधरी, मधुकर आटवाल, इमाम तडवी, योगेश बारी, सुनील चौधरी व विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

WhatsApp Image 2019 07 08 at 19.43.19

शालेय परिसरात वर्गनिहाय वृक्षारोपण
शिक्षण विभागाचे निमगव्हाण केंद्राचे केंद्रप्रमुख युवराज पाटील व ग.स. बँकेचे संचालक देवेंद्र पाटील यांनी दिंडीत सहभागी होऊन भव्य आयोजनाबद्दल विद्यालयाचे कौतुक केले. महिला मंडळ शाळा, थाळनेर दरवाजा, हरताळकर हॉस्पिटल, बाजारपेठ, बारीवाडा, गुजराथी गल्ली या मार्गे निघालेल्या या दिंडीचे शाळेत समापन झाले. दिंडीच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी दिंडीचे पूजन केले माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, यांच्या परिवारातर्फे प्रसन्न गुजराथी, व अवनी गुजराथी यांनी दिंडीचे पूजन करत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. वृक्षदिंडी नंतर शालेय परिसरात वर्गनिहाय वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात वनक्षेत्रपाल पी. बी. पाटील, व्ही. एच. पवार, दत्तात्रय लोंढे, मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. आर. सोनवणे यांनी तर प्रास्ताविक डी. एस. शुक्ल यांनी केले.

Protected Content