तरूणास मारहाण करणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी


जळगाव प्रतिनिधी । शहरातील सह्याद्री नगरात घरासमोर उभा असलेल्या तरुणार मारहाण करत त्याच्या मोबाईल व रोख रक्कम हिसकविल्याची घटना 7 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच तालुका पोलिसांनी 4 संशयितांना अटक केली. त्यांन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना 12 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सह्याद्री नगरतील रहिवासी गुणवंत उर्फ सागर संजय चव्हाण (वय 27) हा रविवार दि. 7 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास त्याच्या घरासमोर उभा असतांना संशयित आरोपी बापू उर्फ पाडूंरंग ताराचंद पाटील(वय 28, रा. निमखेडी, ता. जळगाव) व आकाश वसंत नन्नवरे(वय 27 रा. निमखेडी, ता. जळगाव) यांनी गुणवंत उर्फ सागरकडे येत दोन तीन महिन्यापुर्वी आमचे हिराशिव कॉलनीजवळ भांडण झाले होते तेव्हा तू हसत होता असे म्हणत गुणवंत उर्फ सागर याला मारहाण केली. त्यावेळेस अजय शंकर सपकाळे (वय 26), संजय राजेंद्र राठोड(वय 27) व एक अनोळखी तरुण(सर्व रा. निमखेडी, ता. जळगाव) यांनी सुध्दा मारहान करत बापुउर्फ पांडुरंग याने गुणवंत उर्फ सागच्या खिश्यातील रोख 5200 रुपये तर आकाश नन्नवरे याने मोबाईल हिसकविला. या प्रकरणी गुणवंत उर्फ सागर चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन सोमवरी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होत पोलिसांनी बापु उर्फ पांडूरंग पाटील, अजय सपकाळे, संजय राठोड व आकाश नन्नवरे यांना अटक करत न्या. देशिंगे यांच्या कोर्टात हजर केले असता न्यायालयाने चौघांना दि. 12 पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सुप्रिया क्षीरसागर यांनी काम पाहिले.

 

Protected Content