मुंबईत चार कोटींची रोकड जप्त

over rs 15 crore illegal cash seized in mumbai ahead of assembly elections

मुंबई (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी तब्बल 4 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. वरळी सी-लिंकवरील चेकपोस्टजवळ ही रोकड जप्त करण्यात आली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

सातारा जिल्ह्यातील जावळी येथील दत्तात्रय महाराज कळंबे पतसंस्थेची ही रोकड असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली. मात्र चार कोटींची रक्कम कोणत्याही सुरक्षेशिवाय, एकही अधिकारी सोबत नसताना खासगी गाडीतून नेली जात होती, त्यामुळे संशय निर्माण झाला आहे. जप्त केलेल्या काही रक्कमेबाबत पतसंस्थेचे कर्मचारी स्पष्ट उत्तर देऊ न शकल्याने हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपवण्यात आले आहे. मला या प्रकरणी फसवलं जात असून गाडीत एवढी मोठी रक्कम आहे, याची मला माहिती नव्हती, असे ड्रायव्हरने म्हटले आहे.

Protected Content