धक्कादायक : राजीव गांधी नगरात उकीरड्यावर मृतावस्थेत आढळले स्त्री जातीचे बाळ

जळगाव प्रतिनिधी । रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधी नगरात असलेल्या उकीरड्यावर ४ ते ६ महिन्याचे स्त्री जातीचे बाळ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाळाच्या अज्ञात आईवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजीव गांधी नगर परिसरातील उकीरड्यावर अंदाजे ४ ते ६ महिन्याचे स्त्री जातीचे बाळ आढळून आल्याची घटना मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. भंगार वस्तू उचलणाऱ्या काही मुलांच्या हा प्रकार लक्षात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पीएसआय शांताराम पाटील, पो.कॉ.हरीश डोईफोडे, विजय जाधव, निलेश बच्छाव, सुशिल चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बाळाला उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांना बाळाला मयत घोषीत केले. या घटनेबाबत रामांनद नगर पोलीसात बाळाच्या अज्ञात आईवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

 

Protected Content