तरूणाला काहीही कारण नसतांना बेदम मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील राजदोहरे गावात काहीही कारण नसतांना एकाला बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भगवान शामराव बागुल वय ५२ रा. राजदोहरे ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी १६ एप्रिल रोजी पहाटे ३.३० वोच्या सुमारा गावात राहणारा विशाल सुकदेव गांगुर्डे याने काहीही कारण नसतांना भगवान बागुल यांना पोटात बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता भगवान बागुल यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विशाल गांगुर्डे याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश रावते हे करीत आहे.

Protected Content