खदानीतून पाणी घेण्यास मनाई केल्याच्या कारणावरून महिलेसह दोन्ही मुलांना मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सावदे शिवारातील शेत गट क्रमांक २४३ मध्ये खदानीतील घेण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका महिलेसह त्यांच्या दोन मुलांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शोभाबाई नारायण बडगुजर वय ६३ रा. सावदे ता. धरणगाव ह्या महिला बापु बडगुजर आणि विठ्ठल बडगुजर यांच्या दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे सावदे शिवारातील शेत गट क्रमांक २४३ मध्ये शेत असून त्याच्या शेताच्या बाजूला कृष्णा साळुंखे यांच्या शेतातील खदानीतील पाणी हे शेतीसाठी राखून ठेवले होते. दरम्यान, विनोद कृष्णा ठोंबरे, अक्षय कृष्णा ठोंबरे, गोविंदा नामदेव ठोंबरे, नामदेव पंढरीनाथ ठोंबरे सर्व रा. सावदे ता. धरणगाव यांनी गुरूवार १८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता खदानीतून पाणी काढण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटार लावत होते. त्यावेळी शोभाबाई बडगुजर यांनी हे पाणी आम्ही शेतीसाठी ठेवले असल्याचे सांगितले. याचा राग आल्याने चौघांनी शोभाबाई बडगुजर यांच्यासह त्यांच्या बापू बडगुजर आणि विठ्ठल बडगुजर मुलांना चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने धरणगव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता मारहाण करणारे विनोद कृष्णा ठोंबरे, अक्षय कृष्णा ठोंबरे, गोविंदा नामदेव ठोंबरे, नामदेव पंढरीनाथ ठोंबरे सर्व रा. सावदे ता. धरणगाव यांच्याविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहे.

Protected Content