धरणगावात लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून दोघे इच्छुक

dharangaon congress

धरणगाव, प्रतिनिधी | येथील नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. शिवसेनेकडून अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर भाजपाकडून इच्छुकांची काही नावे समोर येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पण इच्छुकांची उमेदवारीसाठी भाऊगर्दी होत आहे.

store advt

 

त्यात आता कॉंग्रेसही धरणगावमध्ये आपले आस्तित्व दाखवण्यासाठी उमेदवार देवू इच्छित आहे. कॉंग्रेस कडून प्रामुख्याने विकास लांबोळे आणि रामचंद्र माळी हे दोघे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. विकास लांबोळे यांचा चांगला जनसंपर्क आणि कॉंग्रेस पक्षामध्ये वाढत चाललेला त्यांचा दबदबा यामुळे त्यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. तसेच रामचंद्र माळी हे शहरात मोठ्या संख्येने असलेल्या महाजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांचाही विचार पक्षाकडून होवू शकतो, असे सध्याचे चित्र आहे.

error: Content is protected !!