जावेद हबीब याच्यावर कारवाई करा; महाराष्ट्र नाभिक संघटनेचे यावल तहसीलदारांना निवेदन

यावल प्रतिनिधी । “जावेद हबीब याच्या तीव्र निषेध व्यक्त करत त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी” अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने यावल तहसीलदार यांना देण्यात आले.

“नाभिक रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे ४२४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जावेद हबीब नावाचा समाजकंटकांचे केस रचनेचे प्रात्यक्षिक दाखवतानाचे काही व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. अशा प्रकारे स्त्रियांच्या डोक्यावर थुंकून नराधम संपूर्ण स्त्री जातीचा अपमान करत असून या घटनेचा सर्व नाभिक समाज बांधव तीव्र शब्दात निषेध करत आहे. जावेद हबीबवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी” अशा मागणीचे निवेदन यावल येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने यावल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

याप्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ अध्यक्ष शशिकांत वारुळकर, उपाध्यक्ष योगेश वारुळकर , सचिव तुषार सावखेडकर, रणजित भाऊ ठाकरे, मनोज चौधरी, गुणेश वारुळकर, राहुल चौधरी, रुपेश चौधरी, रितेश निबाळकर, राहुल सावखेडकर, सचिन बर्डे, रवींद्र गायकवाड, अमोल अमोदकर, निलेश सोनवणे, सतिश सावखेडकर, लखन चौधरी, नारायण वारुळकर, युवराज हातकर, अनिकेत सोनवणे आदींची उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!