युवा सेनेतर्फे बळीराम पेठेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर उत्साहात

जळगाव, प्रतिनिधी | हिंदू हृदयसम्राट व शिवसेना पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त युवा सेना जळगाव जिल्हा आणि शिवसेना, बळीराम पेठ शाखेतर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरण भव्य शिबिर बुधवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आले. शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती.

शिबिराच्या सुरुवातीला महापौर जयश्री महाजन यांनी शिवसेना संस्थापक तथा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलानी, माजी नगरसेवक सुनील माळी, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पियुष संजयकुमार गांधी, शिवसेना बळीराम पेठ शाखेचे प्रमुख निर्भय पाटील, बिपिन पवार, जितेंद्र बागरे, संदीप ढंढोरे उपस्थित होते.

लसीकरण शिबिरामध्ये बळीराम पेठ परिसरातील नागरिकांनी पहिला डोस व दुसरा डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करून घेतले.कोरोना महामारीमुळे जगभरात मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पूर्ण महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे कोरोना महामारी पळवून लावण्यासाठी सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे प्रतिपादन यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी केले.

लसीकरण शिबिर बुधवार दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून सुरू झाले. शिबिरासाठी आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी ललित भोळे, विपिन पाटील, अनिल गवळी, महेश पाटील, नितीन चंदनकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content