‘लेवा पाटीदार प्रीमियर लीग’ स्पर्धेमध्ये चौथा दिवस गाजवला गोलंदाजांनी

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक सीजन थ्री अंतर्गत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये चौथ्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत फलंदाजांना जखडून ठेवल्याचे दिसून आले. दिवसभरात अनेक मान्यवरांनी मैदानावर हजेरी लावत क्रीडापटूंना शुभेच्छा देत त्यांचे उत्साह वाढविले.

सकाळी पद्मालय किंगने दिलेले ८४ धावांचे आव्हान श्री मोटर्स संघाने ९ षटकातच लीलया पेलले. सामनावीर उमेश चौधरी याला गौरविण्यात आले. पुढील सामन्यात पूनम पेंट्स संघाने ठेवलेले ६४ धावांचे आव्हान सिद्धिविनायक सुपर रायडर्स संघाने लवकर पूर्ण केले. सामनावीर अक्षय अत्तरदे याने २ षटकात फक्त ६ धावा देऊन ३ गडी बाद केले.
तुलसी चॅलेंजर्स संघाने निर्धारित १० षटकांत फक्त ६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुक्ताईनगर संघाने ७२ धावा करून सामना जिंकला. चौथ्या सामन्यात वरणगाव संघाने धुवाधार फलंदाजी करीत १०७ धावांचे लक्ष ठेवले. मात्र भूमी वॉरियर्सने सुरुवातीला केलेले प्रयत्न त्यांना सामना जिंकवू शकले नाही. ते फक्त ९५ धावा करू शकले. दुर्गेश वारके याने दोन शतकात २५ धावांत ३ गडी बाद केले.
नक्षत्र इलेव्हन संघाने ७१ धावांचे ठेवलेले लक्ष्य शिवम सुपर किंगने एकही गडी न गमावता मात्र १६ चेंडूतच पूर्ण केले. यात धीरज कोल्हे यांनी १० चेंडूत ४३ धावा करीत संघाला विजय मिळवून दिला. सहाव्या सामन्यात सोयो सनरायडर्सने तुफान फटकेबाजी करीत १७८ धावा केल्या. यामध्ये सामनावीर जयेश नारखेडे यांनी २४ चेंडूत ८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुक्ताईनगर संघ ६७ धावामध्येच गुंडाळला गेला.

Protected Content