‘भविष्यातील रोजगाराच्या संधी’ ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अप्रेंटिसशिप आय.टी.आय, डिप्लोमा, डिग्री पास तरुणांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे गुरुवार, (दि.१६) रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

या मार्गदर्शन सत्रात श्री. पी. व्ही. पाटील, कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जळगाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे करण्यात आले आहे.

खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा.

गुगल मिट लिंक – https://meet.google.com/eep-kpvz-awp

 

 

Protected Content