महिला महाविद्यालयात दोन दिवसीय चर्चासत्र

जळगाव प्रतिनिधी । अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचालित कला, वाणिज्य व गृह विज्ञान महिला महाविद्यालयात २३ व २५ फेब्रुवारी रोजी दोन राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्या जयश्री नेमाडे यांनी दिली.

शहरातील महिला महाविद्यालयात २३ फेब्रुवारी रोजी बौद्धदिक संपदा हक्क : स्वरूप आणि समस्या याविषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी १० वाजता महिला विद्यापीठाच्या माजी कुलसचिव डॉ. मीना कुटे यांच्या हस्ते होईल. त्या पेटंट, ट्रेडमार्क आणि बौद्धदिक क्षमता या विषयावर मार्गदर्शन करतील. याप्रसंगी अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचेही भाषण होणार आहे. तर चर्चासत्रात माजी प्राचार्य डॉ. एल. ए. पाटील, डॉ. सुरेश मैंद मार्गदर्शन करतील. २५ रोजी औद्योगिकीकरण आणि सामाजिक पर्यावरणीय प्रश्‍न या विषयावर चर्चासत्र होईल. या वेळी माजी सहसंचालक केशव तुपे, ए. पी. चौधरी, डॉ. अब्दुल शाबाना, अर्थतज्ज्ञ डॉ. एच. एम. देसर्डा, डॉ. एस. टी. इंगळे हे मार्गदर्शन करणार आहे. दोन्ही चर्चासत्रांमध्ये सुमारे ६० शोधनिबंध सादर करण्यात येणार आहे. शोधनिबंधांचे ग्रंथ प्रकाशन देखील केले जाणार आहे.

Add Comment

Protected Content