धक्कादायक : ‘त्या’ विवाहितेचा खूनच ; पोलीस कर्मचाऱ्यासह सासू सासऱ्या विरुद्ध गुन्हा

57688de6 4cf3 4f81 9724 160c319e856b 1

 

जळगाव प्रतिनिधी| शहरातील शनिपेठ पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. परंतू आपल्या मुलीने आत्महत्या नव्हे तर, पतीने तिचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. दिवसभर आत्महत्या की खून? यावर काथ्याकूट सुरु होता. अखेर सायंकाळी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, भाग्यश्री प्रशांत पाटील (वय 26, रा. नेहरूनगर) यांनी मध्यरात्री दीड वाजता छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मयत भाग्यश्री या शनिपेठ पोलिसात कार्यरत असलेले प्रशांत प्रकाश पाटील यांच्या पत्नी होत. भाग्यश्री यांनी रात्री गळफास आत्महत्या केल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले होते. दरम्यान, सासरच्या मंडळींनी आरोप केला आहे की, यापूर्वी पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील यांनी दारू पिऊन भाग्यश्रीला मारहाण करत होता. मुलगी रात्री दीड वाजता गळफास घेऊन मयत झाल्यानंतरही पोलिसांनी कुठलाही गुन्हा देखील दाखल न केल्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला होता. खुनाचा गुन्हा दाखल करावा, असा पवित्रा मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे जिल्हा रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान माहेरच्या मंडळींच्या फिर्यादीवरून अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

काय म्हटलेय फिर्यादीत

 

मयत विवाहिता भागश्री यांचे वडील अरूण जगन्नाथ पाटील (वय ६१, रा. प्लॉट नं.८८, शिवप्रताप कॉलनी, नाकाने रोड, देवपुर धुळे) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सर्वात लहान मुलगी भागश्री हीचे लग्न जानेवारी २०१६ मध्ये प्रशांत प्रकाश पाटील यांचे सोबत झाले होते. भाग्यश्रीचे लग्न झाल्यानंतर तीला तिचे पती व सासरे कडील लोकांनी काही दिवस चांगले वागवले. त्यानंतर मुलगा झाल्यानंतर मुलगी भाग्यश्री हीला सासु, सासरे व पतीने त्रास देण्यास सुरुवात केली. सासु प्रतिभा प्रकाश पाटील हया मुलगी हीला सांगीतले की, तु एमए बीएड झालेली आहे. तुला नोकरी लावून देण्यासाठी तु तुझ्या माहेरून २५ लाख रुपये घेवून ये. सदर बाबत मुलगी हीने मला तसेच पत्नी व मुलांना सांगीतले होते. परंतु आमची परीस्थीती २५ लाख रूपये देण्याची नसल्याने आम्ही मुलगी हीला समजावून सांगीतले. त्यानंतर मुलगी हीने पती व सासु व सासरे यांना सांगीतले असता मुलगी हीला जावई प्रशांत पाटील व सासु प्रतिभा पाटील, सासरे प्रकाश पंडीत पाटील यांनी तिला जास्त त्रास देण्यास सुरुवात केली.

 

सदर बाबत मला, पत्नी व मुलगा व मुलींना सांगीतले होते. त्याबाबत आम्ही सर्वानी मुलगी भाग्यश्री हीला समजुत काढली होती. भाग्यश्रीला मी पैसे देवू शकलो नाही. म्हणून मुलगी भाग्यश्री हीला जावाई प्रशांत व त्याची आई व वडील यांनी मारहाण केली. तसेच तिला रक्षाबंधनला पाठविले नाही. त्यानंतर मुलगी भाग्यश्रीकडे माझा मुलगा दिनेश रक्षाबंधनला आलेला होता. त्यावेळी देखील मुलगी भाग्यश्री हीने पती व सासु, सासरे २५ लाख रूपये मागत आहेत. नाही दिले तर तुला हाकलून देवू, तुला सोडून देवू, तुला ठेवणार नाही, तुला जिवंत ठेवणार नाही असे सांगीतले होते. यावेळी जावाई प्रशांत म्हणाले की, काय लुक्खा साला आहे. रक्षाबंधनला काय घेवून आला? असे विचारले. तसेच मुलगी मुलाला शाळेत सोडण्यास जात असता तीला जावू देत नव्हते. तसेच तिच्या चारीत्र्यावर संशय घेत होते.

 

दिनांक २८ रोजी रात्री ०१.०० वाजेच्या सुमारास जावाई अनिल संतोष पाटील यांचा मला फोन आला व त्यांनी सांगीतले की, साडू प्रशांत प्रकाश पाटील यांचा फोन मला आला. त्यांनी सांगीतले की, भाग्यश्री हीने गळफास घेतला आहे. त्यावरून मी माझ्या सर्व नातेवाईकांना फोन लावून माहीती दिली. त्यानंतर आम्ही सर्व नातेवाईक जळगाव येथे धुळे व सौदाणे येथून आलो. जळगाव येथे आल्यावर माहीती मिळाली की, मुलगी भाग्यश्री हीला सिव्हील हॉस्पीटलमध्ये आणले आहे. आम्ही सिव्हील हॉस्पीटलला आल्यावर माहीती मिळाली की, मुलगी भाग्यश्री ही मरण पावली आहे. मुलगी भाग्यश्री हीला माहेरून २५ लाख रुपये घेवून ये, असे तिचा पती प्रशांत प्रकाश पाटील, सासु प्रतिभा पाटील, सासरे प्रकाश पंडीत पाटील यांनी सांगून तिने २५ लाख रुपये माहेरुन न आणल्याने व आमची परीस्थीती २५ लाख रुपये देण्यास असमर्थ असल्याने तीचा पती, सासु व सासरे यांनी त्यामुळे मुलगी भाग्यश्री हीला मानसिकव शारीरीक त्रास देवून तिला गळफास लावून जिवे ठार मारल्याचे म्हटले आहे.

 

इनकॅमेरा शवविच्छेदन ; महसूलचे कर्मचारी पंच

 

महिलेच्या मृतदेहावर इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पंच म्हणून तहसीलदार विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त होता. तर मृतदेह घेण्यास नकार देण्याचा पवित्रा महिलेच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली आहे. विभागीय पोलीस अधिकारी नीलाभ रोहन यांनी नातेवाईकांची भेट घेत वैद्यकीय अहवालानंतरच गुन्हा दाखल करणार, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांनी पती, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करावाच लागेल, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे अखेर एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content