परप्रांतीयांना लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; बाजारपेठ पोलीसांची कारवाई

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सफेद भिलावा देण्याच्या बहाण्याने परप्रांतीय तरुणांना भुसावळात बोलावून मारहाण करीत लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील रेल्वे स्थानक ते साक्री फाट्यावरील जुना टोलनाक्यादरम्यान सोमवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी घडली होती. भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोन संशयितांना भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथून अटक करण्यात आली.

याबाबत अधिक असे की, मिलवकुमार पूनम (वय-२८, रा. कोयागुड्डम मंडळ जि.बद्रादी, तेलगंणा) यांना युट्यूबवर सफेद भिलावा संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी व्हिडिओखाली दिलेल्या संपर्क साधल्यानंतर संशयितांनी त्यांना भुसावळात बोलावले. ठरल्याप्रमाणे सोमवार ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता पूनम व त्यांचा मित्र बुकीया हरीलाल हे भुसावळात आले व रेल्वे स्थानकाबाहेर संशयिताची भेट झाल्यानंतर त्यांनी साक्री फाट्याजवळील जुना टोल नाक्याजवळील खदानीत नेत काठीने मारहाण सुरू केली. संशयितांनी यावेळी २० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, २० हजारांची रोकड, २० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असा एकूण ४२ हजारांचा ऐवज हिसकावून संशयित पसार झाले होते. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी भुसावळ स्टेशन परीसरातील सीसीटीव्ही फुटेजआधारे संशयित विनोद चंद्रकांत सोनवणे (वय-३०, रा. जाडगाव, ता.भुसावळ) व नरेंद्र विकास सपकाळे (वय-३०, रा.साक्री फाटा, भुसावळ) या दोघांना मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाता अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही संशयित होमगार्ड आहेत. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.

Protected Content