सर्वोत्तम गणेशोत्सव मंडळांमध्ये युवाशक्ती फाउंडेशनला तृतीय पुरस्कार

WhatsApp Image 2019 08 29 at 2.17.06 PM

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील सर्वोत्तम गणेशोत्सव मंडळांना बुधवारी जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे २८ रोजी सुभाष चौक येथे झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले. यात युवाशक्ती फाउंडेशनला तृतीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.

युवाशक्ती फाऊनडेशनने मागील वर्षी प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि उपाय या विषयावर देखावा साकारला होता. दहा दिवसात प्लास्टिक मानव आणि पशु पक्ष्यांना कसे हानिकारक आहे तसेच प्लास्टिकला पर्याय काय देता येईल, प्लास्टिक पिशवी ऐवजी कागदी किवा कापडी थैली वापरा असे आवाहन युवाशक्ती फाउंडेशनने केले होते. या प्रभावी आणि परिणामकारक देखाव्याने प्रभावित झालेल्या परीक्षकांनी युवाशक्ती फाउंडेशनला तृतीय पुरस्कार जाहीर केला. बुधवारी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, दीपक जोशी, ललित चौधरी आदि मान्यवरांच्या हस्ते युवाशक्तीच्या पदाधिका-यांनी तो सन्मानपूर्वक स्वीकारला. यावेळी पुरस्कार घेताना संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, सचिव अमित जगताप, सौरभ कुलकर्णी, संदीप सूर्यवंशी, प्रशांत वाणी मंचावर होते. मागील वर्षाचे मंडळ अध्यक्ष पियुष हंसवाल, उपाध्यक्ष शिवम महाजन, सचिव प्रशांत वाणी यांसह तेजस मराठे, पवन माळी आदि सदस्य उपस्थित होते. यंदाच्या वर्षी युवाशक्ती भारतीय सैन्यावर देखावा उभारणार असून सैन्याचे शौर्य, बलस्थान याची माहिती देऊन सैन्यातील रोजगाराच्या संधी यावर मार्गदर्शन करणार आहेत.

Protected Content