ज़िल्हा मांनाकन व निवड चाचणी कॅरम स्पर्धा संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्व. ॲड. सिताराम (बबनभाऊ) बाहेती यांच्या जयंती निमित जळगांव ज़िल्हा कॅरम असो. आयोजित व जैन स्पोर्ट्स अकेडमी यांचा सहकार्याने दि. ३१ जुलै व १ ऑगस्ट २०२२ दरम्यान ज़िल्हा मानांकन व निवड़ कॅरम स्पर्धा शहरातील कांताई हॉल येथे संपन्न झाली.

स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील एकूण ५५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. त्यात ४० खेळाडू पुरुष एकेरी व १५ खेळाडू वयस्कर गटात सहभागी झाले होते. पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सय्यद मोहसिन ( जैन स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव) याने भुसावळच्या बिजली कॅरम क्लबच्या सद्दाम बागवान याचा सरळ दोन सेटमध्ये तसेच दुसऱ्या उपांत्य सामन्यात भुसावळच्या वसीम शेख याने जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या नईम अंसारी याचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतीम फेरीत वसीम शेख याने सय्यद मोहसिन याचा २-१ सेटने पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. वयस्कर गटातील अंतिम सामन्यात एजाज अंसारी याने तोंडापूरच्या कासम शेख याचा दोन सेटमध्ये पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. वसीम खान जळगाव, नाजीम शेख भुसावळ, फिरोज खान जळगाव व अफजल शेख जळगाव यांनी अनुक्रमे पाच ते आठ क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.

विजेत्यांना १२ हजारांची रोख पारितोषिके देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभ रोहन बाहेती, राहुल बाहेती, पांडूरंग खड़के व मंज़ूर खान यांचा हस्ते करण्यात आला. स्पर्धा प्रमुख पंच म्हणून गणेश लोडते यांनी काम पाहिले. अशी माहिती कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेशाम कोगटा व सहकार्यवाह नितिन बरडे यांच्या वतीने देण्यात आली.

सदर स्पर्धेमधून विरार जिल्हा पालघर येथे दिनांक दि. १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 56 व्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेकरिता जळगाव ज़िल्हा संघाची निवड़ करण्यात आली आहे.

 

Protected Content