उद्या युवासेनेची जिल्हास्तरीय बैठक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात होऊ घातलेल्या शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी रविवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वा. सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) जळगाव येथे युवासेनेची महत्वाची जळगाव जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीला शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, जिल्हाप्रमुख हर्षल माने, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यासह युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया व युवासेना विस्तारक किशोर भोसले, चैजन्य बनसोडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. जळगाव व रावेर लोकसभेतील प्रत्येक तालुका, विधानसभा येथील सर्व युवासेना पदाधिकारी, युवासैनिक यांनी बैठकीसाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.