चिमुकलींवर अन्याय करणाऱ्या नराधमास फाशी द्या – लहूजी ब्रिगेड महिला आघाडीची मागणी

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा द्या अशी मागणी लहूजी ब्रिगेड महिला आघाडीतर्फे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, धरणगाव येथे पाच व सात वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली असून शासनाने शक्ती विधायक कायदा मंजूर करून देखील अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या नराधमांना कायद्याचा कुठलाही धाक नसल्याचे या घटनेवरून निदर्शनास येत आहे. तरी शासनाने याबाबत त्वरित फास्टट्रॅक न्यायालयात सदरचे प्रकरण चालून संबंधित गैरकृत्य करणा-या नराधमाला फाशीची फाशीची शिक्षा द्यावी. भविष्यात या कायद्याचा धाक येणाऱ्या काळामध्ये निर्माण झाला पाहिजे अशी मागणी लहुजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आशा अंभोरे, आदिवासी महिला आघाडीच्या अध्यक्षा मालन तडवी, जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस शारदा तायडे यांनी केली आहे.केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी मुली व महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी जेणेकरून महिला व लहान मुलीवर वारंवार होत असलेल्या अन्याय अत्याचाराला आळा बसेल.यासाठी महाराष्ट्र राज्याला महिला मुख्यमंत्र्याची नितांत गरज असून महिला मुख्यमंत्र्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी लहुजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Protected Content