खामगावात भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिनानिमित्त पुतळ्याचे अनावरण

खामगाव प्रतिनिधी । लोकनेते माजी कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आज (दि.21) रोजी फुंडकर कुटूंबियांच्या व भाजपा कार्यकर्ते, प्रेमीजन, हितचिंतक यांच्या उपस्थितीत सुनिताताई फुंडकर, आ.ॲड आकाश फुंडकर व सागर फुंडकर यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

शनिवार रोजी ठीक 11 वाजता  “शक्तिस्थळ” येथे सूनिताताई फुंडकर यांच्या हस्ते  प्रदेश सोशल मीडिया सेल चे सहसंयोजक सागरजी  फुंडकर, जिल्हाध्यक्ष आमदार आकाशदादा फुंडकर, रामेश्वर फुंडकर, वसुंधरा ताई चोपडे(फुंडकर) व फुंडकर परिवाराच्या व भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक, मार्गदर्शक, यांच्या उपस्थितीत लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या  अर्धाकृती पुतळ्याचे अनावर पार पडले.

लोकनेते स्व.भाऊसाहेब हे शेतकरी, शेतमजूर, बहुजन व दिनदुबळयांचे नेते होते.  त्यांनी आपले संपुर्ण  जीवन हे रंजल्या गांजल्यांसाठी अर्पण केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष  असतांना “शत प्रतिशत भाजपा” हा नारा देणारे व त्याप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रात खोलवर भारतीय जनता पार्टीची पाया मुळे रोवणारे नेते होते.  त्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना भाजपाशी जोडले यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता.  आणि जेव्हा महाराष्ट्रात भाजपा “शत प्रतिशत” झाले तेव्हा हा शेतक-यांचा कैवारी आपल्या सगळयांना सोडून निघून गेला.

कृषी मंत्री असतांना आदरणीय भाऊसाहेबांनी विकासाची नवी दिशा दिली. त्यांनी शेतक-यासाठी विविध योजना जाहीर केल्या मागेल त्याला शेत तळे, कांदा चाळ, शेड नेट, तसेच  उन्नत शेती समृध्द शेतकरी या योजनेंतर्गत विशेष अभियान चालवून कृषी यांत्रिकीकरणावर भर देण्यात आली होती.  यामुळे राज्य भरातील लाखो शेतक-यांचे जीवनमान उंचावले होते.  कृषी साहित्य व अवजारे खरेदी करतांना शेतक-यांना सरळ खरेदीचे अधिकार देण्यात आले होते त्यामुळे दलाली यंत्रणा संपुष्टात आली होती.  त्यांच्या निर्णयांचा लाखो शेतक-यांना लाभ ‍ मिळाला होता.

अशा सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे लोकनेते आपल्या सर्वांना घडवणारे कार्यकर्त्यांवर भावा सारखं, मुला सारखं प्रेम करणारे पक्ष संघटनसाठी जीवन अर्पण करणारे गोर गरीबांचे कैवारी स्वर्गीय भाऊसाहेबजी फुंडकर यांचे हे समाधीस्थळ आपल्या सर्वासाठी “शक्तिस्थळ” आहे.

यावेळी नगराध्यक्षा,  भाजपा  प्रदेश पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगर परिषद सभापती, न.प.सदस्य, भाजपा शहर व तालुका पदाधिकारी, सर्व आघाडयांचे प्रमुख व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

 

Protected Content