पाचोरा प्रतिनिधी | नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. अस्मीता पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
डॉ. अस्मीता पाटील या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा होत्या. यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात घुसमट होत असल्याची माहिती समोर आली होती. मध्यंतरी त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी कालच या वृत्ताला लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दुजोरा दिला होता.
या अनुषंगाने नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डॉ. अस्मीता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. ना. शिंदे हे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निवासस्थानी आले असतांना त्यांनी हातात भगवा झेंडा घेतला. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
खालील व्हिडीओत पहा डॉ. अस्मीता पाटील यांचा शिवसेना प्रवेश !