भादली शिवारात शेताच्या कामावरून प्रौढाला मारहाण

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली शिवारात ४९ वर्षीय व्यक्तीला शेतातील कामाच्या वादातून एकाने शेतात लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मधुकार वामन पवार (वय-४९)  रा. कवठळ ता. धरणगाव ता. जळगाव हे शेत मजूरीचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. पवार हे शेतीच्या कामासाठी शुक्रवारी ९ जुलै रोजी जळगाव तालुक्यातील भादली खुर्द शिवारात अशोक छनु चावडा यांच्या शेतात कडबा कुट्टीच्या कामाला महेंद्र नवल पवार रा. कवठळ ता.धरणगाव याच्या सोबत कामाला आले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास हे काम परवडत नसल्यामुळे मी घरी जात असल्याचे मधुकर पवार यांनी सांगितले.

 

Protected Content