सदावर्तेना चार दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – ‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणी मुंबई न्यायालयाकडून अड्.सदावर्तेना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानतर लगेचच सातारा पोलिसांनी अड्.सदावर्तेना मागील दाखल गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेत आज सातारा न्यायालयात हजर केले. यावेळी सातारा न्यायालायात कडून अड्.सदावर्तेना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे अड्.सदावर्तेच्या अडचणीत अजून भर पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावरील हल्लाप्रकरणी अटकेत असलेल्या अड्. गुणरत्न सदावर्तेना मुंबई न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, दीड वर्षापूर्वी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मराठा आरक्षणा संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात सातारा पोलिसांनी न्यायालयाकडे अड्.सदावर्तेचा ताबा देण्याची मागणी केली करीत आर्थर रोड तुरुंगातून अड्.सदावर्तेना गुरुवारी त्यांना ताब्यात घेतले.

खा. उदयनराजे भोसले तसेच खा.छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात सदावर्ते यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना छत्रपती घराण्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर तारळे, ता. पाटण येथील राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अ‍ॅड. सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.  सातारा पोलिसांनी सदावर्तेना ताब्यात घेत आज शुक्रवारी सकाळी अड्.सदावर्तेना सातारा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर सरकारी वकिलांचा युक्तीवाद योग्य ठरवत न्यायालयाकडून अड्. गुणरत्न सदावर्तेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Protected Content