भुसावळात गावठी पिस्तुलासह तरूणाला अटक

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील कवाडे नगर रेल्वे फिल्टर हाऊस परिसरात गावठी पिस्तुल घेवून दहशत निर्माण करणाऱ्या संशयित तरूणांस शहर पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाल्मीक नगर भागातील रहिवाशी विनोद लक्ष्मण चावरीया (वय-४०) हा कवाडे नगर रेल्वे फिल्टर हाऊस परिसरात कब्जात एक गावठी पिस्तुल घेऊन शहरात दहशत करीत आहे. अशी माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना खाजगी वाहनाने आरोपीचा शोधकामी पाठविले असता आरोपी विनोद चावरीया हा रेल्वे फिल्टर हाऊस परिसरात दहशत निर्माण करीत असतांना रंगेहात मिळून आला. २५ जून रोजी दुपारी १२.३० वाजेला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची अंगझडती घेतली असता १० हजार रुपयांची एक लोंखडी गावठी पिस्तुल त्याच्या कमरेतून मिळून आली. आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
म्हणून शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे कायदेशील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलिस स्टेशन कर्मचारी बंटी सैदाने ,साहिल तडवी,संजय बडगुजर, जुबेर शेख, जितेंद्र सोनवणे अशांनी मिळून केली.गुन्हाचा पुढील तपास पोहेकॉ साहिल तडवी करीत आहे.

Protected Content