गावठी कट्टा व जीवंत काडतुसांसह तिघांना अटक

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे ते चौगाव रस्त्यावर गावठी कट्टयासह जीवंत काडतूस बाळगणार्‍या सांगली जिल्ह्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, सांगली जिल्ह्यातील तिघे हे कट्टा व काडतुसांसह चारकाची वाहनातून जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली यानुसार पोलिसांना सापळा लावला. यात चुंचाळे ते चौगाव रस्त्यावर चारचाकी (एमएच ५०/ए-०८०७) ही थांबवण्यात आली. त्यातील सांगली जिल्ह्यातील संदीप आनंदा निकम (२८, बुधगाव, ता. मिरज), विशाल गणेश कांबळे (२६, माधवनगर, ता. मिरज), प्रदीप अरुण साबळे (३५, माधवनगर, ता. मिरज) या तीन इसमांची झडती घेतली असता ३० हजार किंमतीची गावठी बनावटीचा एक कट्टा, ३ हजार रूपये किमतीचे तीन जिवंत काडतुसे, ३ लाख रूपये किंमतीची कब्जातील चारचाकी वाहन व १३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असा एकूण ३ लाख ४६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

या अनुषंगाने संदीप निकम, विशाल कांबळे, प्रदीप साबळे यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५, २५(१) (अ) यासह भादंवि ३४, म. पो. कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार जगदेव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे, पोउपनि रामेश्‍वर तुरनर, पोहेकॉ सुनील पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्‍वर जवागे, शेषराव तोरे, विलेश सोनवणे, जयदीप राजपूत, पोकॉ मिलिंद सपकाळे, प्रकाश मथुरे, योगेश शिंदे, सुभाष सपकाळ, लव सोनवणे यांच्या पथकाने केली.

 

jalgaon | jalgaon news | jalgaon news in marathi | jalgaon breaking news | breaking news of jalgaon | bhusawal | bhusawal news | amalner | amalner news | chalisgaon | chalisgaon news | pachora | pachora news | bhadgaon | bhadgaon news | raver | raver news | muktainagar | muktainagar news | jamner | jamner news | parola | parola news | chopda | chopda news | dhaarangaon | dharangaon news | yawal | yawal news | erandol | erandol news |

Protected Content