कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांबद्दल बोलतांना भान ठेवणे आवश्यकच – फडणवीस

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | अभिनेत्री केतकीने फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली होती, यावर अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिली, त्यात कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांबद्दल बोलतांना काय बोलतो यांचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.

अभिनेत्री केतकीने फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली होती, यावरून राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तिला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. यावर शरद पवार यांनी, कोण केतकी चितळे?, मी तिला ओळखत नसल्याचे म्हटले आहे.

तर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्ली सोशल मीडियावर अतिशयच खालच्या दर्जाचे अपशब्द वापरले जातात. कोणत्याची जेष्ठ नेते वा व्यक्तींबद्दल बोलतांना वयाचे भान ठेवणे गरजेचे असून आक्षेपार्ह शब्द तर कोणीही वापरु नये. याबाबत योग्य तो निर्णय कायदेशीर होईल असे म्हटले आहे.

Protected Content