गिरणावर सात बलून बंधार्‍यांना मान्यता : खा. उन्मेष पाटलांचा यशस्वी पाठपुरावा

Jalgaon जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील गिरणा नदीच्या काठावरील जनतेसाठी नवसंजीवनी ठरणार्‍या सात बलून बंधार्‍यांना मान्यता मिळण्यासाठी आवश्यक असणार्‍या पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली असून यामुळे आता हे बंधारे लवकरच उभारण्यात येणार आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी केलेला पाठपुरावा यातून यशस्वी झाला आहे.

गिरणा नदीच्या पुनरूज्जीवनासाठी खासदार उन्मेषदादा पाटील MP Unmesh Patil यांनी गिरणा परिक्रमा यात्रा काढली असून या माध्यमातून गिरणामाईला पुनर्जीवीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी त्यांनी पाठपुरावा केल्याने व तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने वरखेडे-लोंढे प्रकल्प पूर्णत्वाकडे आला आहे. यासोबत खासदार उन्मेषदादा पाटील यांनी गिरणा नदीवर सात बलून बंधारे उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. यासाठी केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या मिळाल्या असल्या तरी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने राज्य सरकारच्या अखत्यारीत असणार्‍या पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली नव्हती.

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाल्यामुळे खासदार उन्मेषदादादा पाटील यांनी यांना पर्यावरण खात्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या सहकार्याने अखेर आज राज्याच्या पर्यावरण खात्यातर्फे बलून बंधार्‍यांसाठी पर्यावरण खात्याने मान्यता प्रदान केली आहे. यामुळे गिरणा नदीवर लवकरच सात बलून बंधारे उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Protected Content