स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठकीचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वतंत्र भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमीत्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याअनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयात ८ ऑगस्ट रोजी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वतंत्र भारताच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमीत्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात नियोजनांची महत्वाची बैठक जळगाव जिल्हा पोलीस पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जळगांव शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, सामाजिक सेवा संघटना, गणपती नवरात्र मंडळ, महीला मंडळ, क्रिडा संघटना, यांचेकडील ०१ प्रतिनिधी म्हणुन अध्यक्ष / सचिव / जबाबदार पदाधिकारी यांना बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content