जिल्हा आरोग्य अधिकारी यांची धामणगाव आरोग्य केंद्रास भेट   

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील धामणगाव येथे दि. ४ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांनी धामणगाव प्रा. आ. केंद्रास व ममुराबाद आरोग्य उपकेंद्रात सुरु असलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित कार्यक्रमास अचानक भेट दिली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम घोगले, डॉ. अजय सपकाळ, सी एच ओ डॉ. अश्विनी विसावे, पी ओ प्रियंका मंडावरे, आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, आरोग्य सहायिका प्रतिभा चौधरी, कनिष्ठ सहाय्यक महेश वाणी, आरोग्य सेवक घनश्याम लोखंडे, आरोग्य सेविका वैशाली सपकाळे, बबीता करोशिया, जयश्री कंखरे, गट प्रवर्तक, आशा सेविका व संपूर्ण कर्मचारी वृंद उपस्थित होते.

सदर भेटी दरम्यान त्यांनी डिलिव्हरी रूम, हिरकणी कक्ष, आय एल आर (लस साठा), आणि औषधी भांडार गृह यांची पहाणी केली. व बाह्य रुग्ण तपासणीस आलेल्या नागरिकांशी दिल्या जाणाऱ्या सेवा बाबत चर्चा केली आणि अंतर्गत व परिसर स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले. तसेच कोविड लसीकरणात धामणगाव प्रा. आ. केंद्राचे काम जिल्ह्यात सर्वात चांगले असल्याने वैद्यकीय अधिकारी व संपूर्ण स्टॉप चे अभिनंदन केले.

नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त कृष्ठरोग व सक्रिय क्षयरोग शोध मोहिमे अंतर्गत संशयित क्षय रुग्णांचे थुंकी नमुने व क्षयरोग व कृष्टरोग औषधोपचारिक रुग्ण यांचा , तर आता सुरु असलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित कार्यक्रमाचा, अनेमिया मुक्त भारत, आरोग्य केंद्रातील व उपकेंद्रातील प्रसूती वाढवणे, एन. सी. डी. व सर्व राष्ट्रीय कार्यक्रम आदी विषयाचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या व दप्तर तपासणी केली.

Protected Content