किफायतशीर दरात मिळणार कोरोनाची लस – पूनावाला

पुणे प्रतिनिधी । पंतप्रधान मोदी यांनी सिरम इन्स्टीट्युटला भेट दिल्यानंतर याचे सीईओ आदर पूनावाला यांनी कोविशिल्ड ही लस किफायतशीर दरात उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे. पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील मांजरी येथे असलेल्या सिरम इन्स्टिटयूटला भेट दिली. या भेटीत मोदी यांनी कोरोना लसच्या निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यानंतर कंपनीचे सीईओ आदर पुनावाला यांनी कोरोनावरची लस सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होणार असून ती तिचे वितरण प्रथम भारतात केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

याप्रसंगी पूनावाला म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात केली आहे.त्यांना कोव्हीशिल्ड लसेच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. लसेच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत पंतप्रधान समाधानी आहे.

कोरोनावरील कोव्हीशिल्ड लसीच्या तिसर्‍या चाचणीवर आमचे लक्ष आहे.लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी तयारी केली जात आहे. जुलै २०२१ ते २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध केले जाणार आहे. लसीची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि ती सर्वांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पूनावाला यांनी यावेळी सांगितले.

 

Protected Content