छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे नव्याने नामकरण करावे !

लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे अॅक्लेरिक बोर्डाद्वारे नाव देण्यात आले आहे. सदरील नावातुन “धर्मवीर” हे नाव काढुन “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज” असे नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी गुरूवार ६ ऑक्टोबर रोजी पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक शोभा बाविस्कर यांना मराठा सेवा संघातर्फे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे सुनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मुकेश तुपे, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे, आर. पी. आय. चे शहर अध्यक्ष शशिकांत मोरे, रर्ईस बागवान, गणेश पाटील, अनिल (आबा) येवले, जिभाऊ पाटील, किशोर काशिनाथ पाटील, संत तुकाराम नामदेव वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल मराठे, रविंद्र पाटील, राकेश पाटील उपस्थित होते.

पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे. त्या स्मारकात छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करतांना ‘धर्मवीर’ असे विशेषण लावून धर्मवीर संभाजी महाराज असे करण्यात आलेला आहे. भारतीय इतिहासात छत्रपती संभाजी महाजांच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते महाराजांचे कार्य हे कुठल्याही एका विशिष्ठ धर्मासाठी कार्य केले नसून सर्व जाती धर्म अठरापगड जातींसाठी त्यांनी न्यायाची भूमिका घेऊन आपले कार्य केल्याचे दिसून येते. परंतु आपण त्यांचा उल्लेख करतांना “धर्मवीर” असे विशेषण त्यांच्या नावापुढे लावल्याने त्यांना एका विशिष्ठ धर्मापुरता मर्यादित ठेऊन त्यांची भूमिका ही इतर धर्मियांप्रती ही दुष्मनीची होती का ?छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक, छात्रवीर, एक जागतिक राजकीय तत्ववेत्ता, विविध भाषांचे जाणते अभ्यासक, लेखक, तत्वनिष्ठ धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासात आहे. म्हणून आमची आपणास विनंती आहे त्याठिकाणी असलेल्या ‘धर्मवीर’ नावाच्या जागी “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज” असे करण्यात यावे. अशा आषयाचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

Protected Content