दबाबतंत्र : संभाजीराजेंची माघारीची शक्यता?

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा |  संभाजीराजेंना शिवबंधन बांधा आणि राज्यसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी लढवा अशी ताठर भूमिका शिवसेनेची आहे. तर उमेदवारीसाठी सूचक आमदारांचे पाठबळ नसल्याने संभाजीराजेंची एकप्रकारे कोंडी झाल्यामुळे  त्यांच्या माघारीची शक्यता असल्याची चर्चा आहे.

राज्यसभेच्या दहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी ३१ मे शेवटची मुदत असून १० जून रोजी मतदान आहे. राज्यातून रिक्त होणाऱ्या सहा जागांवर  भाजपा दोन, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी एक असे चित्र असून उर्वरित एका जागेवर अपक्ष उमेदवार आणि महाविकास आघाडी पुरस्कृत म्हणून पाठींबा द्यावा, अशी अपेक्षा कोल्हापूरमधून छत्रपती संभाजीराजेनी उमेदवारीची तयारी केली होती. परंतु ल्या वेळी राज्यसभेवर राष्ट्रवादीतर्फे शरद पवार आणि फौजिया खान हे दोन जागांवर शिवसेनेच्या वाढीव मतांवर निवडून गेले होते. तर यावेळी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा असल्याने पक्षविस्तारासह पक्षीय पाठबळ वाढण्यासाठी संभाजीराजेनी शिवबंधन बांधून शिवसेनापुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी अशी भूमिका शिवसेनेची होती. परंतु शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला आहे.

गेल्या वेळी राज्यसभेवर दोन जागांवर राष्ट्रवादीतर्फे शरद पवार आणि फौजिया खान हे दोन जागांवर शिवसेनेच्या वाढीव मतांवर निवडून गेले होते. तर यावेळी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा असल्याने राष्ट्रवादी संभाजीराजेंना मदत करण्याची शक्यता नाही. आणि गेल्या वेळी भाजपला संभाजीराजेंच्या खासदारकीचा पक्षासाठी कोणताही फायदा झालेला नाही त्यांचेही पाठबळ मिळणार नाही, आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किमान दहा सूचक आमदारांचे पक्षीय पाठबळ लागते. आणि हे लक्षात घेऊनच शिवसेनेने कोल्हापुरातून संजय पवार यांना मराठा उमेदवार म्हणून निवडले आहे.

भाजपकडे ५ तर महाविकास आघाडीचे ८ अशी त्रिशंकू अवस्था असल्याने कोणत्याच पक्षाने पाठबळ न दिल्यास संभाजीराजेंपुढे राज्यसभेच्या उमेदवारीतून माघार घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे एकप्रकारे शिवसेनेकडून संभाजीराजेंची कोंडी झाली आहे.
तर मतदान …!
संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होताना महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम राहिल्यास १० जूनला प्रत्यक्ष मतदान होऊ शकते.

Protected Content