पडतीच्या काळात साथ दिल्याने वैशाली सुर्यवंशी यांचा अभिमान – उद्धव ठाकरे

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ज्यांना वाढवले त्यांनी साथ सोडली. पडतीच्या काळात मला साथ देणाऱ्या स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांचा मला अभिमान आहे, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला.

वैशाली सूयवंशी यांनी बुधवारी दोनशे कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची दि. ३ आॅगस्ट बुधवारी दुपारी १२.३० वाजता मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी आमदार किशोर पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आर. ओ. (तात्या) पाटील असते तर असे झालेच नसते असे म्हणत वैशाली सूर्यवंशी व पाचोरा- भडगाव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांचे कौतुक केले.

यावेळी खासदार अरविंद सावंत, निलिमा गोऱ्हे, संजय सावंत, आमदार सचिन आहेर, अंबादास दानवे, रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य दिपकसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, नगरसेवक दत्ता जडे, धर्मेंद्र चौधरी, माजी शहर प्रमुख भरत खंडेलवाल, भडगाव येथील लखीचंद पाटील, शंकर मारवाडी जे. के. पाटील, दिपक पाटील, मच्छिंद्र पाटील, डॉ. योगेंद्रसिंग मौर्य, निर्मल सिड्सचे मुख्य व्यवस्थापक एस. एस. पाटील, नरेंद्रसिंह सूर्यवंशी, प्रमोद दळवी, रवी चोरपगार सह पाचोरा भडगाव तालुक्यातील सुमारे २०० कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content