चाळीसगावात मानाची पूज्यतलवार मातेची मिरवणूक

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करित मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथील देशमुख परिवारातून हजरत पिर मुसा कादरी बाबा उर्फ बामोशी बाबा मानाची पूज्यतलवार मातेची मिरवणूक आज काढण्यात आली.

चाळीसगाव येथील देशमुख परिवारातून मानाची पूज्यतलवार मातेची मिरवणूक आज  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करित मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. हजरत पिर मुसा कादरी बाबा उर्फ बामोशी बाबा तलवार शरीफ तलवार पकडण्याचा मान यावर्षी शिवाजी दत्तात्रय देशमुख यांना मिळाला. ह्या तलवारीची मिरवणुक पूज्य तलवार भालचंद्र देशमुख यांच्या निवासस्थान येथून काढण्यात आली. त्यांच्या सोबत नाझीमोद्दीन काझी राहतात. हजरत पीर मुसा कादरी बाबा यांच्या या तलवारीच्या ताकतीने संपूर्ण मानवजातीवर आलेल्या कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट होईल,अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत हि मानाची पुज्यतलवाराची मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता.

 

Protected Content