राज्यात सवर्ण आरक्षण लागू

मुंबई प्रतिनिधी । सवर्ण वर्गवारीतील आर्थिकदृष्टया दुर्बल असणार्‍या घटकांना आजपासून आरक्षण लागू करण्यात आले असून आज याचा अध्यादेश काढण्यात आला आहे.

अलीकडेच राज्य मंत्रिमंडळाने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला १० टक्के आरक्षण देण्यास मंजुरी दिली होती. आज याचा अध्यादेश काढण्यात आला असून आरक्षण लागू झाले आहे. याआधीच येत्या शैक्षणिक वर्षांपासून देशातील शिक्षणसंस्थांमध्ये खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. तर सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी करणारं गुजरात देशातलं पहिलं राज्य ठरले होते. या पाठोपाठ आता महाराष्ट्रातही सवर्ण आरक्षण लागू करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content