चाळीसगावात गोत्रे मित्र परिवारातर्फे फराळाचे वाटप

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | शहरातील मोरया नगरात महाशिवरात्रीच्या औचित्य साधून अनिल भाऊ गोत्रे मित्र परिवाराच्या वतीने फराळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.

दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त शहरात अनिल भाऊ गोत्रे मित्र परिवाराच्या वतीने फराळ वाटपांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी मोठ्या उत्साहाने अनिल भाऊ गोत्रे मित्र परिवाराने शहरातील मोरया नगरातील महादेव मंदिर येथे अनिल भाऊ गोत्रे मित्र परिवारातर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला परिसरातील माता- भगिनींनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. दरम्यान कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्यांचा अनिल भाऊ गोत्रे मित्र परिवाराने कौतुक केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल गोत्रे , ॲड. अभिषेक चौधरी, प्रवीण गोत्रे , अमोल गोत्रे , मनोज राजपूत, विष्णू गायकवाड , संदीप चौधरी , प्रसाद चौधरी , एकनाथ पाटील , राजेंद्र देवरे , रघुनाथ पवार , कमलेश जाणे , प्रकाश जाधव , दादू पवार , ललित तीरमली, अभिजित गुंजाळ , शुभम गोत्रे , अजय धनगर , विकी गोत्रे , रोहित परदेशी आदी उपस्थित होते.

Protected Content