राज्यातील १४ जिल्हे अनलॉक : जळगावबाबत लवकरच निर्णय

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यामुळे राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आले आहे. तर जळगावसह अन्य जिल्ह्यांबाबतही याच प्रकारे निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरोनाची रूग्णसंख्या कमी होऊ लागल्याने राज्यात लवकरच अनलॉक होणार असल्याची चिन्हे दिसून आली होती. या अनुषंगाने राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलेले आहे. यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग,रायगड, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

नवे नियम ४ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. निर्बंधमुक्त जिल्ह्यांच्या यादीत जळगाव जिल्ह्याचा समावेश नाही हे विशेष.

दरम्यान, अनलॉक झालेल्या १४ जिल्ह्यांमध्ये सर्व सरकारी, खासगी कार्यालये १०० टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास संमती देण्यात आली आहे. या जिल्ह्यातील सर्व शाळा संपूर्ण क्षमतेने भरणार आहेत. रेल्वे किंवा बसने प्रवास करताना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं बंधकारक आहे. चित्रपटगृहं, मॉल्स या ठिकाणी प्रवेश करतानाही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक असेल. मनोरंजन आणि उद्यानं, जलतरण तलाव, वॉटर पार्कही पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची संमती दिलेली असून लग्नसमारंभ, अंत्यसंस्कार यावर असलेले विविध निर्बंधही हटवण्यात आले आहेत. तर, सार्वजनीक जीवनात मास्क वापरण्याची सक्ती मात्र कायम ठेवण्यात आलेली आहे.

Protected Content