शहरातील प्रत्येक परिसर स्वच्छ करा!

 

 

जळगाव, प्रतिनिधी । मनपाच्या आरोग्य, मलेरिया विभागातील सर्वांनी कोविड काळात प्रामाणिकपणे काम केले आहे. रोगराई टाळण्यासाठी आपण स्वतःची काळजी घेत शहरात योग्य स्वच्छता राखावी. करावी. उद्या दि.२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून शहराचा कानाकोपरा कसा स्वच्छ ठेवता येईल, यासाठी प्रत्येकाने कामाला लागावे, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या.

शहरात रोगराई पसरू नये यासाठी शहराची काटेकोरपणे साफसफाई राबविण्यासाठी गुरुवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आपल्या दालनात सर्व आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली. बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, उपायुक्त पवन पाटील उपस्थित होते.

महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले की, शहरात आजवर नियमितपणे स्वच्छता होत आहे. मक्तेदाराच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक आरोग्य निरीक्षकाने लक्ष घालून काम करून घ्यावे. मनपा कर्मचाऱ्यांनी आपल्याला नेमून दिलेला परिसर स्वच्छ ठेवावा, असे महापौरांनी सांगितले. मलेरिया विभागाने देखील आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना त्यांनी केल्या. शहरात स्वच्छता करताना प्रत्येकाने मास्क आणि हँडग्लोज वापरणे आवश्यक आहे. प्रत्येकाला मास्क आणि हँडग्लोज उपलब्ध व्हावे यासाठी महापौरांनी आरोग्य विभागाला सूचना देत ५०० मास्क, १००० हँड ग्लोज, सॅनिटायझर तात्काळ उपलब्ध करून देण्याचे सांगितले.

Protected Content